Skip to content
close

७० च्या दशकातल्या या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का?, आता त्यांना ओळखणं झालंय कठीण


सत्तरच्या दशकामध्ये अनेक अशा अभिनेत्री झाल्या की, त्यांनी अफलातून भूमिका साकारून सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. मात्र, यातील काही अभिनेत्री या काळाच्या पडद्याआड गेल्या. तर काही अभिनेत्रींना ओळख मिळविण्यात यश मिळाले. याप्रमाणे अभिनेत्यांचे देखील असेच आहे.

भालजी पेंढारकर यांनी त्या काळात प्रचंड असे काम केले होते. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत की, ज्यांनी, निवेदिता सराफ यांच्या वडिलांसोबत देखील काम केले. माञ, याबाबत अधिक‌ लोकांना माहिती नाही.

जुन्या काळामध्ये चित्रपटांमध्ये काम करणे हे अतिशय वाईट मानले जायचे. महिलांनी तर चित्रपटात काम करूच नये, असे अनेकांचे म्हणणे असायचे. मात्र, असे असले तरी काही अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चित्रपट हिट केले.

नुकताच एका ज्येष्ठ अभिनेत्रीचा तेजश्री प्रधान हिच्यासोबत एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. या अभिनेत्रीचे नाव अनुपमा असे आहे. मात्र, मूळ नाव हे रेखा कुलकर्णी असे आहे. त्यांचा जन्म २३ एप्रिल १९५० मध्ये झाला.

त्यांचे वडील जयंत कुलकर्णी हे रेल्वेत नोकरीला होते. तर आईचे अलका कुलकर्णी असे आहे. नाट्य लेखक मधुसुदन कालेलकर यांनीच त्यांना अनुपमा असे नाव दिले होेते. त्यांनी रुपारेल कॉलेजातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांना नाटकाची आवड निर्माण झाली. त्यांनी आसावरी या नाटकातून रंगभूमीवर पर्दापण केले.

या नाटकाने त्यांना ओखळ निर्माण करून दिली होती. भालजी पेंढारकर यांच्याकडून त्यांना अभिनयाचे धडे मिळाले. १९६८ मध्ये त्यांनी घरची लक्ष्मी या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. धर्मकन्या हा चित्रपटात प्रचंड चालला होता.

गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी हे त्यांच्यावर चित्रीत झालेले गाणे आजही अनेक लग्नात आपल्याला ऐकायला मिळते. त्यानंतर अनुपमा यांचे एक माती अनेक नाती या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याचे पहायला मिळाले. १९६९ मध्ये आधार हा चित्रपट आला होता. या चित्रपटात अनुपमा यांनी निवेदिता सराफ यांचेे वडील गजन जोशी यांच्यासोबतही काम केले होते.

नाटकात काम करत असतानाच त्यांची ओळख बडोद्याच्या डॉ. दिलीप धारकर यांच्याशी ओखळ झाली. त्यांनतर त्यांनी धारकर यांच्याशी प्रेमविवाह केला. त्यानंतर अनुपमा या परदेशात स्थायिक झाल्या. मात्र, तिकडे राहूनही त्यांनी आपली आवड ही कामय झाेपासल्याचे पहायला मिळाले.


Post Views:
7Source link

Leave a Comment