Skip to content
close

ह्या आजोबांनी भर रस्त्यात सर्वांसमोर केला अतरंगी डान्स, तरुण मुलेसुद्धा झाली आजोबांची फॅन्स – Marathi Gappa

सोशल मीडियावर नेहमी काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर काही व्हिडिओ असे असतात ज्याची आपण कधीही कल्पना केलेली नसते. सध्या सोशल मीडियावर एका नाचणाऱ्या वृद्ध माणसाचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये म्हातारा माणूस एकदम बिनधास्तपणे डान्स करत आहे. लोकांना हा व्हि़डिओ खूप आवडला आहे. वय माणसाला वृद्ध होत असल्याची जाणीव करून देत असत. पण जस वय वाढतं तसे माणसाचे अनुभव वाढतात. अनुभव वाढले की जगणं समृद्ध होतं जातं. आणि मग माणसाला प्रत्येक गोष्टीत आनंद घ्यायची कला प्राप्त होते. म्हणजे अशी माणसं खूप कमी असतात, ज्यांना जगाचं काही घेणं देणं पडलेलं नसतं. त्यांना वय, वेळ, काळ, प्रतिष्ठा काहीच महत्वाच नसतं, त्यांना फक्त आयुष्यात आनंद लुटायचा असतो. वय कितीजरी वाढलं तरी आपल्यातील जोश जिवंत ठेवणारे काही लोक आपल्या भोवताली असतात. त्यांच्यातील उर्जा पाहून कधीकधी तरुणांनाही लाज वाटते. सध्या असाच एक दमदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये एक म्हातारा माणूस आपल्या तरुण मित्रांसोबत अतिशय़ भारदस्त असा डान्स करत आहे. पांढरे कपडे, त्यात कडक इस्त्रीची खादी, डोक्यावर गांधी टोपी आणि पांढऱ्याशुभ्र आणि रूबाबदार मिशा अशा वेशात हे आजोबा असले भारी नाचत होते की त्यांना पाहून आपल्या पण अंगात बळ येईल.

आता तुम्हाला या आजोबांचे डीजे प्रेम, वय आणि अंगात असणारी ऊर्जा बघून आश्चर्य वाटले असेल. पण जगात म्हाताऱ्या लोकांचे 2 प्रकार असतात. यात पहिल्या प्रकारातले काही म्हातारे लोक एकदम थकतात. तर काही म्हातारी अगदी 80 पार करूनही तरुण असल्यासारखी वागतात. विशेष बाब म्हणजे या मनाने तरुण असलेल्या म्हाताऱ्या माणसाचं शरीरही तुलनेने तरुण असतं. यांचं शरीर तरुण असण्याचं कारणही तसंच आहे. त्यांनी तरुण वयात आहार, व्यायाम आणि योग-प्राणायमची उत्तम सांगड घातल्याने त्यांचे मन आणि शरीर तरुण असल्याचे आपल्याला अनेकदा दिसून येते. या व्हायरल झालेल्या व्हिडीओतील आजोबा मनाने आणि शरीरानेही तरुण जाणवत आहेत.

एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी केलेला डान्स बघून सगळी तरूणाई त्यांच्याभोवती डान्स करत आहेत. जसजशी लोक त्यांना बघत आहेत तसा आजोबांना अजूनच चेव चढत आहे आणि ते अधिक ऊर्जेने डान्स करत आहेत. त्यांचा डान्स बघून नाही तर त्यांचा त्या वयातला उत्साह बघूनच तरुण त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत. या व्हिडीओ कमी वेळाचा असला तरी प्रचंड व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर सध्या आजोबा लोकांची चलती आहे. कोण डायलॉग मारून फेमस होत आहेत तर कोणी नाचून अंग हलवून फेमस होत आहेत. विशेष बाब म्हणजे ही सगळी म्हातारी खेड्यातील आहेत. आणि त्यांचे व्हिडीओ पण खेड्यातील आहेत.

या माणसाचा डान्स पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. लोक या माणसाचा डान्स आवडीने पाहत आहेत. या माणसासोबत इतरही काही लोक डान्स करत आहेत. मात्र, स्टाईलीश कपडे घालून तरुणांनाही लाजवेल असा डान्स करणारा साध्या कपड्यांतील वयस्कर आजोबा सर्वांचे आकर्षण ठरलेले आहेत.
आता हा व्हिडीओ तुमचंही मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

Leave a Comment