Skip to content
close

ह्या आजोबांनी भर रस्त्यात फॉरेनर सोबत केला अतरंगी डान्स, बघा व्हिडीओ – Marathi Gappa

डान्स ही अशी गोष्ट आहे, जी करायला प्रत्येकाला आवडते पण करताना आपल्या मनासाठी न नाचता लोकांचा विचार जास्त केला जातो. पण काही लोक मात्र असे असतात की, जिथे कुठे डीजे, ढोलकी, तमाशा नाहीतर ढोल ताशा सुरू होतो, किंवा अगदी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात गाणी सुरू होतात, तेव्हा यांच्या अंगात बळ येतं, काही जणांचा अंगात तर गाणी ऐकताच संचारू लागतं. जिथं आहेत तिथंच ते थिरकायला सुरुवात करतात. काही जणांचा डान्स तर खूपच विचित्र असतो. जो पाहताच आपल्याला हसू आवरत नाही. मात्र काही लोकांचा डान्स एकदम बघावा असा असतो.

आपल्या राज्यात आणि एकूणच देशात डान्सचे अनेक प्रकार आहेत. पाश्चिमात्य देशातले अनेक प्रकारही आहेत, ज्यावर भारतात नृत्य केले जाते. त्यातीलच काही प्रकार सोशल मीडियावर रोज पाहायला मिळतात, जे व्हायरल झालेले असतात. हिपहॉपपासून तर कथ्थकपर्यंत अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होतात. आणि लहान पोरांपासून तर वयस्कर आजोबांपर्यंत सगळ्यांचे डान्स व्हिडीओ व्हायरल होतात.

आता आमच्याकडे एका वयस्कर आजोबांनी केलेला डान्स व्हिडीओ आलेला आहे. या व्हिडीओत त्यांनी चक्क एका फॉरेनरसोबत डान्स केला आहे. एका बाजूला हा फॉरेनर त्याच्या देशातल्या पध्दतीने डान्स करत आहे तर आजोबा आपल्याच स्टाईलने नाचत आहेत. आजूबाजूला असलेले लोक आपल्याला काय म्हणतील? या विचारांना कोळदंडा देत ते मस्तपैकी एन्जॉय करत आहेत.

आयुष्यात एकदा आनंदाने जगायचं ठरवलं की मग वय, पैसा-अडका आणि इतर भौतिक सुखं या गोष्टी गौण ठरतात. अगदी उतारवयातही अनेक लोक जीवनाचा आनंद भरभरून लुटतात. हेच या व्हीडिओत दिसत असल्याने हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हीडिओत एक आजोबा बॉलीवूड चित्रपटातील गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. या वयातही आजोबांचा उत्साह थक्क करणारा आहे. आजोबा संपूर्ण गोल गोल फिरून डान्स करत आहेत. एरवी सत्तरी ओलांडली की अनेकजण अंथरुणाला खिळतात. परंतु, डान्स करताना आजोबांच्या अंगात सळसळून उर्जा वाहत आहे. या डान्समध्ये त्यांना साथ देणारा व्यक्तीही तसाच भारी आहे. या दोघांच्या अफलातून डान्समुळे त्यांचा सोशल मीडियावर फिरणारा हा व्हीडिओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.

हिंदी गाण्यावर पहिल्यांदाच एक फॉरेनर आणि एक पक्का भारतीय माणूस नाचताना लोकांनी बघितला असेल. त्यातही रस्त्यावर यांना नाचताना कुणीच बघितलं नसेल. त्यातही भारी गोष्ट म्हणजे हा विदेशी व्यक्ती एकदम तरुण वयाचा आहे तर आपला माणूस वयस्कर आहे मात्र एकदा डान्स करायला लागल्यावर त्यांची केमिस्ट्री भारी जमली आहे. या आजोबांनी ज्या पद्धतीने तन मन एक करून लोक काय म्हणतील याचा विचार न करता जो अफलातून डान्स केला आहे त्याला आमचा सॅल्युट आहेच पण रस्त्यावर असं मनसोक्तपणे नाचण्यासाठी जी हिम्मत लागते, त्यासाठीही या आजोबांचे आम्हाला कौतुक वाटते. अशी जुगलबंदी आजवर तरी जगात कुणी बघितली नसेल. आपली संस्कृती जपत विविध संस्कृतीचा सन्मान करणारा भारतीय माणुस म्हणून आपल्याला या आजोबांचा अभिमान आहे.

आता हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

Leave a Comment