Skip to content
close

ह्या आजीने सर्वांसमोर केला अतरंगी डान्स, आजीचा उत्साह तर तरूणींनाही लाजवेल – Marathi Gappa

आपली टीम ज्या विविध विषयांवर लेखन करते त्यातील काही विषय आम्हाला अगदी प्रिय आहेत. त्यातील एक म्हणजे आजी किंवा आजोबा किंवा दोघांनी केलेला डान्स हा विषय होय. आम्हाला हा विषय आवडतो याच प्रमुख कारण म्हणजे या वयाने मोठ्या पण मनाने तरुण असणाऱ्या मंडळींचं कौतुक वाटतं. कारण ही मंडळी मोठी होत असताना त्यांच्या या आवडी निवडीला कितपत प्रोत्साहन मिळालं असेल वा नसेल याची कल्पना नसते. पण म्हणून ही मंडळी आताच्या त्यांच्या वयात थांबताना दिसत नाहीत. आलेला दिवस आनंदाने जगावा आणि आपल्याला आवडेल तो छंद जोपासावा अशी त्यांची भूमिका दिसते.

बरं यांच्यातील काही जण तर हा छंद म्हणून पण जोपासताना दिसत नाहीत. पण त्यांच्यातील उर्मी आणि उत्साह त्यांना थोडी गप्प बसून देतोय. काही क्षणी एखादं गाणं वाजलं की आपोआप या मंडळींचे पाय थिरकायला लागतात, खांदे उडायला लागतात आणि मस्त डान्स सुरू होतो. ते ही अगदी नकळत. काही वेळा तर आपल्याला त्यांच्या वयोमानामुळे लक्षात ही येत नाही की ही मंडळी एवढी उत्साही असतील. पण अशी एखादी घटना घडून जाते की यांच्यातील उत्साहाचं दर्शन घडवून देते.

याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्या टीमने बघितलेला एक व्हिडियो होय. हा व्हिडियो आहे एका आजींचा. खरं तर बऱ्यापैकी काळापूर्वी हा व्हिडियो प्रसिद्ध झाला होता. पण त्यातील आजींचा उत्साह आजही डान्स करण्याची उर्मी देऊन जातो. म्हणून म्हंटलं याविषयी एकदा लिहावं. असो. तर या आजी एका मिरवणुकीत सामील झालेल्या असतात. आता ती मिरवणूक कसली, कोणाची, कशासाठी वगैरे कळत नाही. पण एक प्रसिद्ध गाणं चालू असतं जे आपल्याला ऐकायला ही येतं आणि आजी नाचता नाचता ते गाणं पुतपुटताना दिसतात. हे प्रसिद्ध गाणं म्हणजे ‘तेरे आख्यां का यो काजल’ हे ते गाणं. सपना चौधरी या लोकप्रिय नृत्यांगनेने केलेल्या डान्समुळे हे गाणं अतिशय लोकप्रिय ठरलं आहे. इतकं की त्यांचा स्वतःचा डान्स वायरल झाला आहेच. सोबतच इतरांनी केलेले डान्स ही वायरल झाले आहेत. एका लहान मुलीचा डान्स तर इतका वायरल झाला होता की त्यावर आपल्या टीमने लिखाण केलं होतं. एवढंच काय मध्यंतरी काही लेख लिहीत असताना ही या गाण्याचा उल्लेख झालेला आहेच आणि आता या आजींचा हा व्हिडियो. त्यामुळे खऱ्या अर्थाने लहानथोर सगळ्यांना आवडणारं हे गाणं आहे हे मान्य करायला हवं.

यावर या आजी डान्स करतात म्हंटल्यावर कौतुक वाटतं. कारण गाणं तसं उडत्या चालीचं आहे. आजींच्या वयाच्या अनेकांना आवडेलच अस नाही. पण या आजी मात्र या गाण्याची मस्त मजा घेत डान्स करतात. त्यांचा हा डान्स काही सेकंदच बघायला मिळतो. पण या वेळातही, वर उल्लेख केल्याप्रमाणे जी ऊर्जा आणि उत्साह असतो ते थक्क आणि प्रेरित करून जातात. आपणच काय तर आजूबाजूला असलेल्यांना ही त्यांचं कौतुक वाटत असतं. शेवटी तर एक ताई येऊन त्यांना मिठी मारतात तेव्हा याची खास प्रचिती येतेच. असो. आपण हा व्हिडियो बघितला असेल तर एव्हाना आपणही या व्हिडियोतील आजींचा उत्साह वाखाणला असेलच. पण आपण हा व्हिडियो पाहिला नसेल तर जरूर पहा. आपल्याला आवडून जाईल.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

Leave a Comment