Skip to content
close

ह्या आजीने सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, स्टेप्स पाहून तुम्हीदेखील आजींचे फॅन्स व्हाल – Marathi Gappa

आपल्या प्रत्येकाचं एखादं का होईना असं आवडतं व्यक्तिमत्व असतं. या व्यक्तिमत्त्वाला पाहून, ऐकून आपल्याला आपसूक उत्साह येतो. ऊर्जा मिळते. का कुणास ठाऊक पण छान वातावरण निर्माण होतं. बरं या व्यक्ती कधी सेलिब्रिटीज असू शकतात तर कधी अगदी आपल्या घरातले, आजूबाजूचे अनेक जण ही असू शकतात. या व्यक्तींचं असणं आपल्याला बरीचशी ऊर्जा देऊन जातं.

असं आपल्या टीमच्या बाबतीत अनेक वेळा होतं. कारण आपली टीम लेखांच्या निमित्ताने का होईना पण अनेक व्हिडियोज पाहते. त्यात अनेक वेळा वायरल व्हिडियोज ही असतात. अशा व्हिडियोज पैकी काही व्हिडियोज मध्ये असणारी माणसं ही पुन्हा नवीन व्हिडियोज मध्ये दिसून येतात. मग आपसूक त्यांना बघितलेल्या जुन्या व्हिडियोजच्या आठवणी ही जागृत होतात. आता आजच्याच व्हिडियोचं उदाहरण घ्या ना. हा व्हिडियो आहे एका आजींचा. पण हा या आजींचा एकमेव व्हिडियो नाही.

याआधी ही आजींनी केलेल्या मस्त जबरदस्त डान्समुळे त्यांचे काही व्हिडियोज वायरल झाले होते. आपल्या टीमने ही ते व्हिडियोज पाहिले होते. त्यावेळी ही आजींचा उत्साह बघता त्यांचं कौतुक वाटलं होतं आणि त्यांच्याविषयी लेख लिहिला होता. आज तसंच पुन्हा घडलं असं म्हणू शकतो. कारण या आजींचा व्हिडियो समोर आला आणि त्यांचा डान्स पुन्हा आवडून गेला.

एकतर त्यांच्या डान्स स्टेप्स या कोरिओग्राफ केलेल्या नाहीयेत पण त्या अगदी मनापासून आलेल्या आहेत. त्यामुळे आपसूकच वाजणाऱ्या बिट्स वर त्या स्टेप्स अगदी बरोबर बसतात. बरं सोबतच वर उल्लेख केलेला उत्साह आणि ऊर्जा आहेच. खरं तर त्यांच्या वयात सहसा एवढा उत्साह आणि ऊर्जा दाखवली जात नाही. पण या आजींना डान्स करण्याची अगदी मनापासून आवड असावी. कारण या व्हिडियोत तर आपल्याला गाणं ही ऐकू येत नाही. असतात त्या फक्त बिट्स आणि त्यावर या आजी डान्स करत असतात. त्यामुळे त्यांचं हे डान्स प्रेम पाहून छान वाटतं.

अनेक वेळा आपली आवडनिवड जपण्यात, ती वाढवण्यात लोकं काहीशी लाजतात. इतर लोकं काय म्हणतील वगैरे विचार त्यांच्या मनात येत असतात. अगदी नैसर्गिक आहे ते. पण खरं बघितलंत ना मंडळी तर या आजींसारखा आयुष्याचा आनंद घेत राहिलात तर लोकांचं कौतुकच वाट्याला येतं. हा लेख याचं एक छान उदाहरण आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. असो. अर्थात या आजींप्रमाणे स्वतःच्या अवडीनिवडींचा आस्वाद घ्या पण इतरांना त्याचा त्रास होणार नाही याचीही काळजी आजींप्रमाणे घ्या.

तर मंडळी हा होता आपल्या टीमकडून आपल्यासाठी आजचा लेख. आमच्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम सातत्याने लेखन करत आली आहे आणि करत राहील. आपणही आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देत आले आहात आणि देत राहाल हे नक्की. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे आपण न वाचलेले अन्य लेख जरूर वाचा. आठवणीने ते सगळे शेअर करा आणि आपल्याला झालेला आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

Leave a Comment