Skip to content
close

ह्या आजींनी सारा अली खान पेक्षा सुद्धा केला भारी डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील आजींचे कौतुक कराल – Marathi Gappa

जेवढ्या व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो. पण ढोबळमानाने जर या वृत्तींचं वर्णन करायचं झालं तर आयुष्याविषयी आशा अपेक्षा बाळगणारे आणि त्याविषयी उदासीन असणारे असे दोन गट पडू शकतात. यात ढोबळमानाने पहिल्या गटात वयाने तरुण किंवा मध्यम वयाच्या व्यक्तींचा सहसा समावेश असतो. तर उरलेल्या वयोगटातील व्यक्तींचा समावेश दुसऱ्या गटात होतो. खरं तर अशाच पद्ध्तीने विभाजन व्हावे हे काही ठोस म्हणणं नाही, पण सहसा हे तसेच दिसते. पण प्रत्येक गोष्टीस अपवाद हे असतातच. यामुळे अगदी काही तरुण मंडळी सुद्धा थोडीशी निराशावादी तर वृद्ध मंडळी उत्साही, आनंदी दिसून येतात. याच जेष्ठ मंडळींचं आपण वयाने जेष्ठ आणि मनाने तरुण अस नेहमीच वर्णन करत असतो.

किंबहुना आपल्यापैकी प्रत्येकाला मनोमन या मंडळींसारख आनंदी आणि उत्साहाने वागावं असं वाटत असतं. काही वेळा तर आपण त्यांच्याकडून प्रेरणा ही घेतो. आता आपल्या टीमचंच उदाहरण घ्या. आपली टीम सातत्याने व्हिडियोज बघत असते. त्यातील काही व्हिडियोज हे अशाच मनाने तरुण व्यक्तींचे असतात. त्यांचा उत्साह हा खरंच आपल्याला ही ऊर्जा देऊन जातो. यामध्ये अगदी आघाडीवर असणाऱ्या एक आजी आहेत. त्यांचं नाव रवीबाला शर्मा. होय, त्याच ज्यांना आपण डान्सिंग दादी म्हणून ओळखतो. खरं तर त्यांना डान्सची आवड प्रचंड होती.

त्यांच्या घरात कलेला पोषक वातावरण ही होतं. पुढे त्यांनी त्यांच्यातील कलाकाराला जपलं. त्या संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होत्या. पण म्हणून डान्स विषयी असलेलं त्यांचं प्रेम कमी झालं नव्हतं. त्यांनी आपल्या सासूबाईंच्या पाठिंब्याने ही आवड जपली सुदधा होती. पण त्यांचं हे नृत्य प्रेम सगळ्यांसमोर येण्यासाठी कारणीभूत ठरला तो लॉकडाऊन. या काळात ही नृत्याची आवड जोपासत होत्याच. त्यांच्या मुलाने त्यांच्या नृत्याचे व्हिडियोज सोशल मीडियावर अपलोड करण्यास त्यांना मदत केली. या काळात अनेक कलाकारांनी हे केलं होतं. आजींना हे माध्यम नवीन होतं. पण त्यांची ऊर्जा, उत्साह आणि त्यांच्या डान्स स्टेप्स यांनी सगळ्यांच्या मनात घर करायला सुरुवात केली होती. किंबहुना त्यांच्या चाहत्यांची संख्या वाढायला लागली होती. आजही ती वाढते आहेच. इतकंच काय पण अनेक सेलिब्रिटीजनी सुद्धा त्यांचं वेळोवेळी कौतुक केलं आहे. आम्हीही त्यांचे परफॉर्मन्स पाहिले आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांच्या उत्साहाचं कौतुक वाटलं. आम्ही त्यांच्यावर याआधी लेखही लिहिला आहेच. पण मग आज पुन्हा लेख का? कारण आजींचा अजून एक व्हिडियो खूप वायरल होत असलेला बघायला मिळतो आहे. या व्हिडियोत ही आजींचा उत्साह, ऊर्जा आणि प्रसन्नता बघायला मिळते.

उत्तम डान्सर असल्याने स्टेप्स आणि हावभाव हे ही अगदी गाण्यानुसार बदलत असतात. त्यामुळे व्हिडियो छोटा असला तरी त्याच्यातून आनंद मिळतो. हा व्हिडियो आम्ही बघितला आणि आम्हाला आवडून गेला. त्यात काही काळापूर्वी आलेल्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटातील सारा अली खानच्या एका गाण्यावर त्यांनी हा डान्स परफॉर्मन्स केला आहे. मूळ गाण्यातील डान्सला जितका प्रतिसाद मिळाला नाही त्यापेक्षा जास्त आजींचा व्हिडियो गाजतो आहे. म्हंटलं याविषयी आपल्या वाचकांना ही कळायला हवं. त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेला आहे. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आजींचं कौतुक वाटलं असेलच. पण आपण नसेल बघितला तर जरूर बघा, आपल्याला आवडून जाईल हे नक्की.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

Leave a Comment