Skip to content
close

हे फक्त भारतातच घडू शकतं, ह्या माणसाने दुचाकीवर केलेला जुगाड तुम्ही ह्या अगोदर कुठेच पाहिला नसेल – Marathi Gappa

आपण कोण आहोत याविषयी प्रत्येकाची काही मतं असतात. तसेच आपण कोण असायला हवं याविषयी ही मतं असतात. पण या दोहोंमध्ये एक गोष्ट नेहमी सामायिक असते. ती म्हणजे ‘डोकेबाज’ असणं किंवा असण्याची इच्छा असणं. डोकेबाज व्यक्ती ही तशाच असतात. त्यांच्याकडे सहसा परिस्थितिचे आकलन करणे, त्यावर उपाय शोधणे आणि त्यासाठी अर्थातच कृती करणे हे गुण असतात. हे गुण असलेली व्यक्ती, मग तिचं शिक्षण कितीही कमी वा जास्त का असेना पण आयुष्यात नेहमीच पुढे जात राहते.

आपल्याकडे अशांना अनेक वेळेस जुगाडू म्हंटलं जातं. पण खरं पाहता जुगाडू म्हणजे वेळ मारून नेणारी व्यक्ती होय. त्यांचं वागणं किंवा त्यांचे उपाय हे दीर्घकालीन असतीलच असे नाही. उलट डोकेबाज व्यक्ती मात्र सहसा उपयुक्त अशा उपायांच्या शोधात असतात. कारण वेळ मारून नेणारं काम किती काळ टिकेल याचा काही नेम नसतो. बरं हे सगळं आजच का सुचलं? कारण आज आपल्या टीमने एक व्हिडियो बघितला. तो व्हिडियो बघून व्हिडियोतील माणसाने मस्त जुगाड केलाय असं प्रथमदर्शनी वाटून गेलं. पण नंतर लक्षात आलं की हा केवळ जुगाड नाहीये. म्हणजे कामचलाऊ नाहीये. त्याने केलेल्या गोष्टींचा त्याच्या वैयक्तिक आयुष्यात दररोजच्या जीवनात त्याला फायदा होत असणार. त्यात तो रोजच्या रोज बदल करत नसणारच.

हा विचार आला आणि नकळत त्या डोकेबाज माणसाला आम्ही सलाम ठोकला. काय केलं होतं असं या माणसाने? त्याआधी थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊ. हा व्हिडियो चित्रित केला आहे एका चारचाकी गाडीतून. वर उल्लेख केलेला डोकेबाज माणूस म्हणजे छोट्या झुलत्या पाळण्याला चालवणारा कलाकार असणार. हा डोकेबाज माणूस आपल्या कुटुंबासह एके ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो. त्याचेवळी ही चारचाकी बाजूने जात असते. या चारचाकीतील माणसं काही तरी बघतात आणि त्यांना नकळत या डोकेबाज माणसाचं कौतुक वाटून जातं. ते या घटनेचे चित्रीकरण करतात आणि हे चित्रीकरण म्हणजे आज आपल्या टीमने बघितलेला व्हिडियो होय. या व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा डोकेबाज माणूस एका दुचाकीवरून जात असतो. पण ती केवळ दुचाकी नसते. ती एका ढकल गाडी प्रमाणे काम करत असते. या दुचाकीला या माणसाचा हा झुलता पाळणा जोडलेला असतो. तो एका बाजूने जोडलेला असतो. खरं पाहता दुचाकी ही एखादी गोष्ट ओढून नेऊ शकते पण ढकलेल काशी? उत्तर आहे थेट दुचाकी त्या पाळण्याला जोडून. बरं अस असलं तरी ट्राफिक असलेल्या रस्त्यावरून जाणं कसं जमेल? उत्तर आहे या माणसाने त्या पाळण्याला दिशा देण्यासाठी स्टीअरिंग व्हील जोडलेलं असतं. दुचाकी पाळण्याला जोडली आहे इथपर्यंत ठीक होतं.

कारण असाच काहीसा प्रकार आपण सिनेमातही पाहतो. पण चारचाकी गाडीच स्टीअरिंग व्हील जोडलेलं पहिलं आणि या माणसाला सलाम ठोकला. बरं या सगळ्या प्रवासात त्याच्यासोबत त्या पाळण्यात बसलेली एक मुलगी ही दिसून येते. त्यामुळे हा पाळणा केवळ पोटापाण्यासाठी नसून प्रवासासाठी ही उपयुक्त असल्याचं दिसून येत. खरं सांगतो मंडळी, आतापर्यंत अनेक व्हिडियोज बघितले. अनेकांनी आश्चर्यचकित केलं. पण यासारखा हाच. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आवडला असणारच आहे. पण आपण नसेल बघितला तर जरूर बघा. खरं तर थोडा जुना व्हिडियो आहे पण आजही जबरदस्त वाटतो. एकदा नक्की पहा.

असो. तर मंडळी, हा होता आजचा लेख. आमची टीम आपल्यासाठी म्हणून नेहमीच उत्तमोत्तम लेख लिहीत असते आणि लिहीत राहील. आपणही आम्हाला जसा छान प्रतिसाद देत आहात तसाच प्रतिसाद यापुढेही देत राहाल हे नक्की. लवकरच एका नवीन विषयावरील लेखासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे आपण न वाचलेले अन्य लेख वाचा. त्यांचा आनंद घ्या आणि सगळे लेख आठवणीने शेअर करा. आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

Leave a Comment