Skip to content
close

सैफ करीना आपल्या छोट्या नावबांसोबत झाले स्पॉट, जेह दिसत होता अतोषय गोंडस.. – Viral Batmya
बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानने कोरोना व्हायरसवर मात केली आहे, मात्र तिचा कोविड-19 रिपोर्ट निगेटिव्ह येताच ती पुन्हा पार्टीला गेलेली दिसली आहे. आणि यामुळे ती आता पुन्हा ट्रोलर्सच्या जाळ्यात अडकली आहे. दोन आठवड्यांपूर्वी करण जोहरच्या घरी पार्टी केल्यानंतर करिनाला कोव्हिड-19चा संसर्ग झाला होता. सीमा खान, अमृता अरोरा आणि महीप कपूरही तीच्यासोबत पोसिटीव्ह आल्या होत्या. करण जोहरचे घर कोरोनाचे हॉटस्पॉट नसल्याचेही करणने सोशल मीडियावर स्पष्ट केले होते.

बरं, करीनाला तिच्या घरी क्वारंटाईन करण्यात आलं होतं आणि पूर्ण दोन आठवड्यांनंतर ती घराबाहेर पडली आहे. करीना आपल्या कुटुंबीय सैफ अली खान, तैमूर अली खान आणि जेहसोबत ख्रिसमस पार्टीत पोहोचली होती. त्यांनी संपूर्ण कपूर फॅमिलीसोबत ख्रिसमस लंच पार्टी केली. यादरम्यान ती जबरदस्त लूकमध्ये दिसली. सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंचा बोलबाला आहे. करिनाने काळ्या रंगाच्या टी-शर्टसोबत तपकिरी रंगाची टॅन पँट घातली होती. त्याचवेळी सैफ निळ्या रंगाचा शर्ट आणि पँटमध्ये दिसला.

तैमूरने पिंक कलरचा कुर्ता-पायजामा घातला होता, ज्यामध्ये तो खूपच क्यूट दिसत आहे. जेह त्याची आई करीनाच्या कडेवर दिसला. दोन आठवड्यांपूर्वी करीना कपूरला कोरोनाची बाधा झाली होती. तिने करण जोहरच्या पार्टीला हजेरी लावली होती, जिथे तिच्यासोबत अमृता अरोरा, सीमा खान आणि महीप कपूर यांनाही कोरोना झाला होता. करीनाला घरातच क्वारंटाइन करण्यात आले होते, तर सैफ समोरच्या इमारतीतून तिची काळजी घेत होता.

याचा एक फोटो करीनाने सोशल मीडियावर पोस्ट देखील केला होता. यादरम्यान करिनाने आपल्या मुलांनाही खूप मिस केले. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली की तिला कोरोनाचा तिटकारा आहे, कारण यामुळे ती आपल्या मुलांना भेटू शकत नाही. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, प्रेक्षक लवकरच करिनाला ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात बघणार आहेत, ज्यामध्ये आमिर खान देखील मुख्य भूमिकेत आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Leave a Comment