Skip to content
close

शूटिंग पाहणाऱ्या ‘ज्या’ लहान मुलाला रविना टंडनने सेट वरुन हाकलले, आज तोच आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉JoinViews:
44

मित्रांनो!, यालाच म्हणतात नशिबाचा खेळ. सुप्रसिद्ध बॉलीवूड हिरोईन रविना टंडनच्या एक चित्रपटाचे शूटिंग बघत असलेल्या या मुलाला सेट वरून चक्क हा’क’ल’ले होते रवीनाने, मोठेपणी तोच मुलगा बनला आहे बॉलिवूडचा सुप्रसिद्ध स्टार!


तर त्याचे असे झाले की, नव्वदच्या दशकातील सुपर हॉट आणि सुंदर हिरोईन्स पैकी एक रवीना टंडन त्यावेळी यशस्वी हिरोईन होती. जेव्हा रवीना स्क्रीनवर डान्स करायची तेव्हा चित्रपट रसिकांचा कलिजा खलास व्हायचा. तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये तु’फा’न गा’ज’ले’ले आयटम नंबरही केले आहेत. आपल्यातल्याही काही सिने रसिकांनी रवीनाच्या या दिलकश अदाकारीवर शिट्ट्या आणि टाळ्यांचा पा’ऊ’स पा’ड’ला असेल.

पण तुम्हाला हे माहित आहे का की, एकदा रवीना टंडनच्या सुप्रसिद्ध फिल्मचे शूटिंग पाहणाऱ्या एका १२ वर्षाच्या मुलाला सेटबाहेर चक्क हकलवण्यात आले होते. तसे पाहिले तर, त्याला हा’क’ल’ण्या’चे कारण खूपच क्षुल्लक होते तरीही तो मुलगा परत काही त्या चित्रपटाचे शूटिंग पाहू शकला नाही आणि आज चक्क तोच मुलगा बॉलिवूडवर आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी राज्य करत आहे. चला तर मग, जाणून घेऊया या अभिनेत्याबद्दल.

Ranveer vs Raveena


रवीना टंडन तिच्या एका चित्रपटाचे शूटिंग करत होती की तिथे उभे असलेला १२ वर्षाचा मुलगा सतत तिच्याकडे पहात होता. रवीनाला पाहून तो मुलगा वेडेवाकडे तोंड करून, विचित्र हावभाव करत होता. त्यामुळे फिल्म शूटिंगच्या त्या शॉटमध्ये रविनाचे लक्ष लागले नाही. ती विचलित होत होती. तो असे काही वेडेचाळे करीत होता की रवीनाला ते अजिबात सहन होत नव्हते. आणि शेवटी ती प्रचंड चिडली आणि तिने स्पॉट बॉयला त्या वेडेचाळे करणाऱ्या मुलाला शूटिंगच्या ठिकाणावरून चक्क हा’क’लू’न द्यायला सांगितले.

मित्रांनो!, तो १२ वर्षाचा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून दीपिकाचा नवरा सुप्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग आहे, ज्याने बॉलिवूडमध्ये अनेक हिट फिल्म्स दिल्या आहेत. आज जरी रणवीरने चित्रपटांच्या माध्यमातून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले असले तरी बालपणापासूनच तो अत्यंत व्रात्य आणि खोडकर आहे. (तसे तो आजही वेडेचाळे करतोच म्हणा.)

697243 ranveer singh


सॅन २०१० मध्ये बँड बाजा बारात या चित्रपटाच्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीत यशस्वी पदार्पण करणारा रणवीर सिंग आज बॉलिवूडचा सर्वोच्च दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची पहिली पसंती आहे. खरं तर, त्यांनी गोलियो की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत अशा अनेक ऐतिहासिक चित्रपटांमध्ये काम करून या चित्रपटांचा दर्जा व पातळी वाढविली आहे. या चित्रपटांशिवाय भन्साळी कॅम्पचा आवडता रणवीरने बेफिक्रे, गुं’डे, लेडीज वि रिकी बहल, किल दिल आणि लू’टे’रा यासारख्या इतर बॅनरखाली काही सुप्रसिद्ध चित्रपट केलेले आहेत.

रणवीर सिंग बद्दल आणखी माहिती सांगायची झाल्यास तो, अनिल कपूरचा पुतण्या आहे . या नात्याने तो सोनम कपूरचा चुलत भाऊ असून, काका अनिल कपूर यांच्यासोबत तो रविनाच्या त्या चित्रपटाच्या शूटिंगला गेला होता.

72


आता तो स्टार झाल्यावर जेव्हा रविनाला हे समजलं तेव्हा ती खूप हसली होती. तर मित्रांनो!, बॉलिवूडच्या या मायानगरीत असे अनेक किस्से नेहमीच घडत असतात. त्यातील काही आम्ही तुमच्यासाठी इथे घेऊन येत असतो. असो…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment