Skip to content
close

या अभिनेत्रीने केले दुसऱ्यांदा लग्न; पहिले लग्न मोडण्यामागे आहे धक्कादायक कारण


या अभिनेत्रीने केले दुसऱ्यांदा लग्न; पहिले लग्न मोडण्यामागे आहे धक्कादायक कारण

बॉलिवूडमध्ये गेल्या महिन्यात विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांचे धुमधडाक्यात लग्न झाले. राजस्थानच्या सवाई माधवपुर येथे हे लग्न पार पडले. अतिशय कमी लोकांची उपस्थिती या लग्नाला होती.

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये देखील काही अभिनेता, अभिनेत्रींचे देखील‌ लग्न झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोनाली कुलकर्णी हिने काही महिन्यांपूर्वीच लग्न केले. त्याचप्रमाणे मानसी नाईक हिने देखील काही महिन्यांपूर्वीच लग्न केल्याचे पाहायला मिळाले.

इतर काही अभिनेते देखील आता लग्न लवकरच करणार असल्याचे सांगण्यात येते. आज आम्ही आपल्याला एका अभिनेञीबद्दल माहिती देणार आहोत त्या अभिनेत्रीने दोन वर्षांपूर्वी साखरपुडा केला. मात्र, आता तिने साखरपुडा मोडून दुसऱ्याच एका व्यक्ती सोबत लग्न केले आहे. या अभिनेत्रीचे नाव सई कल्याणकर असे आहे.

कल्याणकर हिने मार्च 2019 मध्ये संजय शेजवळ यांच्यासोबत साखरपुडा केला होता. मात्र, वैयक्तिक कारणांमुळे या दोघांनीही नंतर आपण लग्न करणार नसल्याचे सांगितले होते. आता सई कल्याणकर हिने डॉक्टर प्रशांत चव्हाण सोबत लग्नगाठ बांधली आहे.

सई कल्याणकर हिने दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेमध्ये चोपडाई देवी ची भूमिका साकारली होती. ही भूमिका साकारणे अतिशय कठीण असल्याचे सई कल्याणकर हिने सांगितले होते. सई हिने या आधी देखील अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.

सईने डॉक्टर प्रशांत चव्हाणसोबत 15 ऑक्‍टोबर रोजी तिने अतिशय साध्या पद्धतीने आपल्या साखरपुडा केला. या साखरपुड्याला मराठी चित्रपट सृष्टीमधील अनेक कलाकार उपस्थित होते. आता या दोघांनी नुकतेच लग्न केले केल आहे.

काही दिवसांपूर्वीच सईने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यामध्ये तिचा पती डॉक्टर प्रशांत चव्हाण यांच्या सोबत दिसत आहे. सईने ‘दख्खनचा राजा जोतिबा’ आणि ‘भेटी लागी जीवा’ यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

आगामी काळामध्ये तिच्याकडे अनेक मालिका आणि चित्रपट असल्याचे सांगण्यात येते.


Post Views:
8Source link

Leave a Comment