Skip to content
close

मोठा होऊन कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर ह्या मुलाने दिले असे की सर्वांचीच बोलती बंदताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉JoinViews:
312

मित्रांनो लहान असताना कित्येकदा आपल्याला तुम्ही मोठं होऊन कोण बरं बनणार? असा प्रश्न विचारण्यात आला असेलच. अर्थातच थोरमोठी मंङळी ही लहान मुलांना नेहमी त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी असे प्रश्न विचारतात. सामान्यपणे बहुतांश मुलं ही मोठेपणी ङॉक्टर, इंजिनिअर अशीच उत्तरे देतात. परंतु सध्या एका अशा मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. ज्याने या प्रश्नाचे एवढे मजेशीर उत्तर दिले आहे की तुम्हांला ऐकून खूप हसू येईल. अहो इतकंच नव्हे तर त्याला हा प्रश्न विचारणारा रिपोर्टर सुद्धा थक्क झाला.

आतापर्यंत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, नेतेमंडळी हे जनतेला आकर्षित करण्याच्या मागे लागलेले आहेत. तर अनेक रिपोर्टर सुद्धा नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एका लहान मुलाला सुद्धा रिपोर्टरने असाच प्रश्न विचारला आहे. त्याचे मजेशीर अंदाजात त्याने उत्तर दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल की एक रिपोर्टर आपल्या हातात एक माईक घेऊन मुलांच्या मध्ये बसला आहे. त्याच्या शेजारी असलेल्या एका मुलाच्या खांद्यावर त्याने हात ठेवला आहे. तो त्या मुलाला प्रश्न विचारतो की, मोठं झाल्यावर कोण होणार, असे त्याला विचारतो. तो मुलगा देखील न लाजता अगदी बिनधास्तपणे उत्तर देतो. परंतु तो असं उत्तर देतो, ज्याचा आपल्याला विश्वास सुद्धा बसणार नाही.

तो मुलगा सांगतो, मला लिहित नाही, वाचता येत नाही, मग आम्ही कोण बनणार ? हो, पण आम्ही मोठं होऊ तेव्हा आम्ही काम करू, आमचं घर उभारू, खाऊ- पिऊ आणि बायकोला आणू आणि काय करणार, दोन- तीन मुलं होतील. यापेक्षा जास्त काय करणार. त्या मुलाचं हे उत्तर ऐकून रिपोर्टरला सुद्धा हसू येते. लग्नानंतर दोन- तीन मुलं असा प्रश्न तो रिपोर्टर मुलाला करतो.

मग मात्र तो मुलगा भङकतो आणि म्हणतो की मुलं जन्माला घालणार नाही तर मग आणखी काय करणार. आम्ही काय मुलांशिवाय राहायचं का? हे ऐकून तर रिपोर्टरची सुद्धा अक्षरशः बोलती बंद होते. एकंदरीत हा संपूर्ण व्हिडीओ पाहून त्या मुलाच्या धाङसीपणाचे आणि त्याच्या विश्वासाचे कौतुक केले जात आहे. एका युजरने तर या मुलांना आधी शिक्षण द्या. म्हणजे त्यांचे विचार बदलतील, असे मुख्यमंत्र्यांना स्पष्ट आवाहन केले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.


Leave a Comment