Skip to content
close

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील ‘हा’ कलाकार सोडणार मालिका ? समोर आले मोठे धक्कादायक कारण


‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील ‘हा’ कलाकार सोडणार मालिका ? समोर आले मोठे धक्कादायक कारण

झी मराठी या वाहिनीवरील नुकतीच सुरू झालेली “माझी तुझी रेशीमगाठ” ही मालिका आता नवीन वळण घेत आहे. या मालिकेत यशच्या सिमी काकुला ऑफिस मधील सत्य माहिती झालेले असते. या संदर्भातच काही भाग सध्या मालिकेत दाखवण्यात येत आहेत.

यश आणि समीर या दोघांचे ऑफिसमधील सत्य समोर आणण्यासाठी सिमी काकू एक युक्ती करते. त्यात घारतोंडे याची नोकरी जाते.यश याचे समोर सत्य बाहेर येते. घरी जेव्हा याबद्दल वाद होतो तेव्हा सिम्मी म्हणते की, मी हे सर्व यशचे सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी केले आहे.

समीर यश चा बॉस आहे आणि यश एक कर्मचारी म्हणून काम करत आहे, हे सत्य मला सर्वांसमोर आणायचे होते. समीर हा यश चा खूप छान मित्र असतो. यश साठी तो ऑफिसमध्ये बॉस असल्याचे नाटक करतो. यशला प्रत्येक संकटात समीर मदत करत असतो.

यश आणि समीर दोघे मिळून परदेशात देखील मोठा बिझनेस उभा करतात.आज आपण या समीर विषयी जाणून घेणार आहोत. या मालिकेमध्ये श्रेयस तळपदे याने यांची भूमिका साकारली आहे. त्याने अनेक वर्षानंतर छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे.

तसेच या मालिकेमध्ये नेहा ची भूमिका अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने साकारली आहे, तर समीरच्या भूमिकेत अभिनेता संकर्षण कराडे दिसला आहे. या तिघांनीही अतिशय जबरदस्त असे काम या मालिकेत केले आहे. त्याचप्रमाणे या मालिकेमध्ये परीची भूमिकादेखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

ही भूमिका मायरा वायकूळ हिने साकारली आहे. झी मराठी या वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सध्या चर्चेत आहे.या मालिकेतील एक कलाकार ही मालिका सोडणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. हा कलाकार म्हणजे मालिकेत समीर ची भूमिका साकारणारा अभिनेता संकर्षण कराडे.

संकर्षण याने ही मालिका सोडण्याचे दोन कारणे चर्चिली जात आहेत. एक म्हणजे तो झी मराठीवर येणाऱ्या एका नवीन कार्यक्रमात दिसणार आहे. या कार्यक्रमाचे नाव किचन कलाकार असे असणार आहे. किचन कलाकार हा शो लहान मुलांसाठी असणार आहे. या शोचं सूत्रसंचालन तो करणार आहे. या शोमुळे माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सोडण्याची शक्यता आहे.

याशिवाय “तू म्हणशील तसे” या नाटकाचे दमदार प्रयोग सुरू झाले असल्यामुळे ही मालिका सोडणार आहे. तर आपल्याला संकर्षण साकारत असलेली “माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील समीर ची भूमिका आवडते का? ते आम्हाला नक्की सांगा.


Post Views:
6Source link

Leave a Comment