Skip to content
close

माकडाचा चेहऱ्यावर मास्क लावण्याचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ – Marathi Gappa

सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित गोंडस, रागीट तसेच विचित्र क्षणांचे व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. प्राणीप्रेमींना किंवा कॉमेडी व्हिडीओ असेल तर हे व्हायरल व्हिडीओ मोठ्या आवडीने पाहायला लोकांना आवडतात. एवढंच नाही तर सोशल मीडियावर असा कोणताही व्हिडीओ, फोटो अपलोड झाला की तो लगेचच व्हायरल होतो. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. आता तुम्हाला वाटलं असेल, हे काय मध्येच… प्राण्यांविषयी बोलता बोलता थेट कोरोनाविषयी बोलू लागले. पण विषय असाय मित्रांनो… प्राण्यांचं डोक हे मानवप्राण्यांपेक्षा जास्त जोरात चालतं. त्यांना रस्त्याने कसं चालावं? निसर्गाचं संवर्धन कसं करावं? हे कळत असतं. यात सगळ्यात हुशार म्हणजे माकड… आता आपण परत कोरोनाकडे येवुयात. को’रोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. लोक विनाकारण गर्दी करत आहेत. काळजी घेणेही कमी झाले आहे.

दिवसेंदिवस जसे रुग्ण वाढताहेत तसे गांभिर्य वाढू शकते. मात्र आता कोरोना बरा होतो, हे कळल्यापासून लोक बिनधास्त काळजी न घेता फिरत आहेत. को’रोनाशी बचाव होण्यासाठी मास्क वापरा, 20 सेकंद हात धुवा आदी उपाय सुचवले जात आहेत. राज्य सरकार व केंद्र सरकारनेही विविध माध्यमातून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पण, अजूनही अनेक लोकं या नियमांचं पालन करताना दिसत नाही आणि त्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावं लागले आहे. मास्क घाला अशी वारंवार विनंती लोकांना करावी लागत असताना एका वानराचा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

वानर, माकड हे आपले पूर्वज. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खूप काही संशोधन आणि संवर्धन करून ठेवलेले आहेत. मात्र त्याची आपल्याला किंमत नाही आणि किंमत नाही म्हणून काळजीही नाही. तर विषय असाय की… जे लोकांना नाही कळलं ते एका माकडाला कळलं.

को’रोनापासून बचावासाठी सर्वसामान्यांच्या हातातील सर्वात मोठं ह’त्यार म्हणजे मास्क. त्यामुळे काही लोक मास्क लावूनच तर काही लोक विनामास्क घराबाहेर पडत आहेत. आजच्या या व्हायरल व्हिडीओत आपल्याला दिसून येईल की, आता तर माकडंही मास्क लावू लागले आहेत. या व्हिडीओत आपल्याला दिसते की, एका माकडाने मास्कने फक्त नाक, तोंड नाही तर आपला संपूर्ण चेहराच झाकून घेतला आहे. मास्क लावण्याची माकडाची हटके स्टाईल सर्वांना आवडत आहे. माकडालाही मास्कचं महत्त्वं समजतं आहे, हे पाहून लोकांनाही आश्चर्य वाटतं आहे.

सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हा व्हिडीओ एका वन अधिकाऱ्याने शूट केला आहे. हा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा लोकांनीही एकदम भारी भारी प्रतिक्रिया दिल्या आहेत. माकडाने ज्या पद्धतीने माणसांना अक्कल शिकवली आहे, ते पाहून सगळेच हा व्हिडीओ शेअर करत आहेत. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

Leave a Comment