Skip to content
close

मलायकासोबतच्या नात्यावर अर्जुननं सोडलं मौन, म्हणाला तिचे जास्त…


मलायकासोबतच्या नात्यावर अर्जुननं सोडलं मौन, म्हणाला तिचे जास्त…

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या नात्याची सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. दोघंही नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. पण त्यांच्या वयातील फरकामुळे त्यांना सोशल मीडियावर नेहमीच ट्रोल केलं जातं.

मलायका अरोरा अर्जुन कपूरपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे जेव्हा हे दोघंही सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करतात त्यावेळी त्यांना ट्रोल केलं जातं. पण आता या सर्व गोष्टींवर अर्जुन कपूरनं मौन सोडलं आहे. मलायका आणि त्याच्या वयातील अंतराबाबत अर्जुननं मोठं वक्तव्य केलं आहे.

अर्जुन कपूर ३६ वर्षांचा आहे तर मलायका अरोरा ४८ वर्षांची आहे. मलायका अरोरानं अभिनेता अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर काही वर्षांनी अर्जुनसोबतचं नातं सर्वांसमोर मान्य केलं. पण त्यांना नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता यावर बोलताना अर्जुन म्हणाला, ‘सर्वात आधी मला वाटतं की, फक्त मीडियाच लोकांच्या कमेंटवर जास्त लक्ष देते.

आम्ही तर जवळपास ९० टक्के कमेंट्सवर लक्ष देत नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या ट्रोलिंगला फार महत्त्व देण्याची गरज नाही. यातील अर्ध्यापेक्षा जास्त अकाउंट्स हे खोटे असातात.’अर्जुन म्हणाला, ‘जे लोक आम्हाला ट्रोल करतात, त्यांच्यापैकी प्रत्येकजण आमच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी उत्सुक असतो.

त्यामुळे यावर विश्वास ठेवू शकत नाही. मी माझ्या खासगी आयुष्यात काय करतो हा माझ्या वैयक्तीक प्रश्न आहे. जोपर्यंत लोक माझं काम पाहत आहेत तोपर्यंत माझ्यासाठी बाकी सर्व गोष्टी केवळ गोंगाटाप्रमाणे आहेत.’अर्जुन पुढे म्हणाला, ‘अशा गोष्टींमुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेणं चुकीचं आहे.

मग तुम्हाला तुमच्या वयावरून ट्रोल केलं जात असेल किंवा इतर काही. आम्ही फक्त आमचं आयुष्य जगत आहोत आणि दुसऱ्यांना त्यांचं आयुष्य जगू देत आहोत. जेव्हा आम्हाला आमच्या वयातील अंतरावरून ट्रोल केलं जातं तेव्हा मला वाटतं हे खूपच बालिश आहे.

एखाद्या वयावरून त्याच्या नात्याचा अंदाज लावणं चुकीचं आहे.’


Post Views:
7Source link

Leave a Comment