Skip to content
close

‘मन उडू उडू झालं’ फेम इंद्रा चा झाला भीषण अपघात… विडिओ व्हायरल


छोट्या पडद्यावर “मन उडू उडू झालं” ही मालिका प्रेक्षकांचे चांगलच मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. या मालिकेमध्ये इंद्राची भूमिका करणारा अभिनेता अजिंक्य राऊत हादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मराठवाड्यातील अनेक कलावंत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपला जम बसवताना दिसत आहेत. त्यामध्ये मोठी यादी आपल्याला देता येईल. परभणी जिल्ह्यातील अनेक कलाकार हे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये चांगला जम बसवत आहेत. यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी संकर्षण कराडे याचे नाव घेता येईल.

संकर्षण हा मूळचा परभणीचा रहिवासी आहे. गेल्या अनेक वर्षापासून तो मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहे. त्याने म्हटलेल्या कविता या प्रेक्षकांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवतात. त्याने केलेली विठ्ठला वरची कविता ही एवढी व्हायरल झाली होती की, या कवितेने त्याला अफाट लोकप्रियता मिळवून दिली.

आता संकर्षण सध्या “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेमध्ये समीरची भूमिका साकारताना दिसत आहे. तर मराठवाड्याचे इतर कलाकार म्हणजेच मकरंद अनासपुरे, नंदू माधव, कमलाकर सातपुते यांनी देखील मराठी चित्रपट सृष्टी गाजवून सोडली आहे.

हे सगळे कलाकार बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत, तर संदीप पाठक हा बीड जिल्ह्यातील माजलगावचा रहिवासी आहे. संदीप पाठक यांनी अनेक चित्रपट आणि मालिका देखील काम केलेले आहे. संदीप पाठक यांचा एकपात्री प्रयोग वराड निघाले लंडनला लक्ष्मण देशपांडे यांचे नाटक प्रचंड गाजत आहे.

संदीप हे नाटक गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत. तर मकरंद अनासपुरे यांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक अजरामर अशा भूमिका केलेल्या आहेत, तर नंदू माधव यांनी “हरिश्चंद्राची फॅक्टरी” यासह हिंदी चित्रपटातही आपल्या भूमिकेने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले आहे. नंदू माधव यांनी सिंबा या या चित्रपटात रणवीर सिंह याच्यासोबत भूमिकादेखील केलेली आहे.

“मन उडू उडू झालं” या मालिकेतील इन्द्रा म्हणजेच अजिंक्य राऊत हा देखील मूळचा परभणीचा चा रहिवासी आहे. अजिंक्य राऊत याचा नुकताच अपघात झाल्याचे समोर आले आहे. याबाबतचा व्हिडिओ देखील त्याने शेअर केलेला आहे. दिवाळीनिमित्त अनेक कलाकार हे आपल्या घरी जात असतात.

अजिंक्य राऊत हादेखील आपल्या घरीच जात होता. तो मूळचा परभणी चा रहिवासी असल्याने तो आपल्या मित्रासोबत कारने परभणीला निघाला होता. मात्र, रस्त्यातच त्याचा एक भीषण अपघात झाला. त्याची कार एका शेतामध्ये जाऊन उलटली. या अपघातामधून तो बालंबाल बचावला.

याबाबत त्यानेच व्हिडिओ शेअर करून ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. अजिंक्य राऊत म्हणाला की, एखादा अपघात झाल्यावर काय होते, हे मी आज अनुभवलेले आहे. आता माझे आयुष्य आहे ते हे मला बोनस मिळाल आहे. असेच म्हणावे लागेल.

आपल्या सगळ्यांचे प्रेम आणि ईश्वराची कृपा यामुळेच मी अपघातातून बालंबाल बचावलो. दिवाळीसाठी माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी हे खूप मोठे गिफ्ट असल्याचे त्याने सांगितले. तर आपल्याला अजिंक्य राऊत हा आवडतो का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.


Post Views:
1

Source link

Leave a Comment