Skip to content
close

‘बिग बॉस’च्या घरातून गायत्री दातार ‘Out’, सुरक्षित स्पर्धकांची नावे समोर


‘बिग बॉस’च्या घरातून गायत्री दातार ‘Out’, सुरक्षित स्पर्धकांची नावे समोर

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे. सध्या ‘बिग बॉस मराठी’चे ३ पर्व सुरु आहे. ‘बिग बॉस मराठी’ सुरु झाल्यापासून प्रेक्षकांना सतत स्पर्धकांमध्ये वाद पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे या आठवड्यातील बिग बॉसची चावडी पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुक आहेत.

या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार? कोण सुरक्षित असणार? याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.दर आठवड्याच्या शेवटी शनिवार रविवारी बिग बॉसमध्ये बिग बॉस चावडी हा भाग रंगतो. यावेळी बिग बॉसचे होस्ट महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा घेताना दिसतात. या आठवड्यात कोण चुकलं, कोण नीट खेळतंय याबाबत स्पर्धकांना सांगताना दिसतात.

दरवेळी रविवारी बिग बॉस चावडीच्या शेवटी बिग बॉसच्या घरातील एक स्पर्धक बिग बॉसमधून एक्झिट घेताना दिसतो.यंदाच्या आठवड्यात बिग बॉस मराठीतील उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ, सोनाली पाटील, गायत्री दातार आणि जय दुधाणे हे स्पर्धक एलिमिनेशन राऊंडसाठी नॉमिनेट झाले होते.

यातील उत्कर्ष आणि मीरा हे दोघेही सुरक्षित झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर सोनाली, गायत्री आणि जय यांच्यातील कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांमध्ये जय आणि सोनाली हे दोघेही सुरक्षित असल्याचे बोललं जात आहे.

त्यामुळे गायत्री दातार बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेण्याची शक्यता आहे. यामुळे आज गायत्री ही बिग बॉसच्या घरातून स्पर्धकांसह इतर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.तर दुसरीकडे नुकतंच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शेवटचं कॅप्टन्सी कार्य पार पडले. ‘जो जिता वही सिकंदर’ असे या टास्कचं नाव होतं.

घरातील पात्र सदस्यांसोबतच अपात्र सदस्यांनादेखील उमेदवारी मिळत असल्याचं बिग बॉसने गुरुवारी जाहीर केलं. त्यामुळे शेवटचं कॅप्टनपद कोणाला मिळणार आणि कोण बिग बॉसच्या घराचा शेवटचा कॅप्टन बनणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.अखेर या टास्कमध्ये मीनल शाहने बाजी मारली आहे.

त्यामुळे घरातील शेवटचे कॅप्टनपद तिला मिळाले आहे. त्यासोबतच बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये जाणारी ती पहिली स्पर्धक ठरली आहे. यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. अनेकांनी तिला शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत.


Post Views:
1Source link

Leave a Comment