Skip to content
close

नुकतेच लग्न झालेल्या या प्रसिद्ध जोडप्याने दिली गोड बातमी, फोटो शेअर करून अभिनेत्री म्हणाली… – Viral Batmya
अभिनेत्री काजल अग्रवालने नुकतीच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. काजल लवकरचं आई होणार आहे. ही आनंदाची बातमी ऐकून चाहतेही खूप खूश आहेत. काजल नुकतीच पती गौतम किचलूसोबत गोव्यात सुट्टी एन्जॉय करत होती. आता ती परत आली आहे. कायम सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या काजलने पतीसोबत बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. फोटो सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होत आहे.

फोटोमध्ये काजल आणि पती अत्यंत सुंदर आणि ग्लॅ’मरस दिसत आहे. फोटोमध्ये दोघांनी काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. काही दिवसांपूर्वी जेव्हा काजलला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं, तेव्हा ती प्रेग्नंट असल्याची शक्यता वर्तवली जात होती पण अभिनेत्रीने याचा नकार दिला होता. ई-टाइम्सशी बोलताना ती म्हणाली, “मला आता याबद्दल बोलायचे नाही. योग्य वेळ आल्यावर मी याबद्दल बोलेन.”

आणि आता काजलने स्वतः बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला आहे. आनंदाची बातमी कळाल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. काजल अग्रवालने तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘क्यों हो गया ना’ पासून केली होती. त्यानंतर ती ‘सिंघम’मध्ये दिसली. या चित्रपटात तीच्यासोबत अजय देवगन दिसला होता.

‘स्पेशल 26’ या अक्षय कुमारच्या चित्रपटामध्ये आणि ‘दो लफ्जों की कहानी’ मध्ये आपल्या चमकदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात एक खास ओळख निर्माण केली. तीच्या नावे अनेक तमिळ आणि तेलगू चित्रपट आहेत. त्यांच्या प्रभावी चित्रपटांमधे मुंबई सागा, आचार्य, मोसागल्लू, हे सिनामिका, पॅरिस पॅरिस आणि कमल हासनच्या इंडियन 2 चा समावेश आहे.

एका मुलाखतीत काजल म्हणाली होती की, ‘आम्ही दोघे वर्षानुवर्षे एकमेकांना ओळखत होतो, पण लॉकडाऊन दरम्यान आम्ही अनेक आठवडे एकमेकांना भेटू शकलो नाही, एकमेकांना पाहू शकलो नाही. आम्ही बऱ्याच वेळा मास्क घालुन ग्लोसरी स्टोअरवर भेटयचो. या वेळी आम्हाला समजले की आम्हाला एकत्र राहायचे आहे. दरम्यान, गौतमने मला लग्नासाठी प्रपोजही केले आणि मला नकार देता आला नाही.’

Leave a Comment