Skip to content
close

दिवं’गत अभिनेत्री श्रीदेवीच्या दोन्ही मुली आहेत घरात बंद, फोटोज पोस्ट करून अभिनेत्रीने समोर आणली धक्कादायक बाब!! – Viral Batmya
गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एकापाठोपाठ एक बॉलिवूड कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. मंगळवारी, जान्हवी कपूरने तिची आणि धाकटी बहीण खुशी कपूरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी करणारी एक पोस्ट शेअर केली. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टा’ग्राम हँडलवर ही पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये जान्हवीने तिला आणि खुशीला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी करत लिहिले, नमस्कार मित्रांनो, माझी आणि माझ्या बहिणीची कोरोना चाचणी 3 जानेवारीला पॉझिटिव्ह आली आणि आम्ही बीएमसीने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार होम आयसोलेशन पूर्ण केले आहे. अभिनेत्रीने पुढे लिहिले की, ‘पहिले दोन दिवस खूप कठीण होते आणि नंतर दर दुसर्‍या दिवशी आम्ही दोघं बरे होत गेलो.

या विषाणूपासून स्वतःचे रक्षण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मास्क घालणे आणि स्वतःचे लसीकरण करणे. स्वतःची काळजी घ्या.’ नुकतेच जान्हवीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. यातील एका चित्रात ती तोंडात थर्मामीटर लावून तापमान तपासत आहे.

हा फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर जान्हवी आणि खुशी कपूर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच सिद्धार्थ सेन गुप्ता दिग्दर्शित ‘गुड लक जेरी’ या चित्रपटात दिसणार आहे. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे, चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय यांनी केली आहे.

याशिवाय ती करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’ या चित्रपटातही दिसणार आहे. हा चित्रपट 2008 मध्ये आलेल्या अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम अभिनीत ‘दोस्ताना’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रुही’ या चित्रपटात अभिनेत्री शेवटचा दिसली होता. या चित्रपटात तिने अभिनेता राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती.

Leave a Comment