Skip to content
close

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत पुन्हा नवा ट्विस्ट, ‘आई कुठे काय करते’ ची लेखिका साकारणार मालिकेत महत्वाचे पात्र


‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत पुन्हा नवा ट्विस्ट, ‘आई कुठे काय करते’ ची लेखिका साकारणार मालिकेत महत्वाचे पात्र

स्टार प्रवाह वाहिनीवर ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेतून एकत्र कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे. यात कानिटकर आणि वर्तक कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत नवनवीन ट्विस्ट येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या मालिकेत आणखी एक नवा ट्विस्ट येणार आहे. या मालिकेत लवकरच अपूर्वा वर्तकच्या आईची एंट्री होणार आहे.‘ठिपक्यांची रांगोळी’ अभिनेता चेतन वडनेरे हा प्रमुख भूमिकेत दिसत आहे. चेतन हा या मालिकेत शशांक कानिटकर हे पात्र साकारत आहे.

शशांकनंतर या मालिकेत अपूर्वा वर्तक हे पात्र प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. यात अपूर्वाची भूमिका अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर साकारत आहे.या मालिकेत अपूर्वा आणि शशांकची सतत सुरु असणारी नोकझोक पाहणे प्रेक्षकांना आवडत आहे. तर दुसरीकडे कानिटकरांचे एकत्र कुटुंबामुळे ही मालिका प्रसिद्धीझोतात असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान आता या मालिकेत अपूर्वाच्या आईची एंट्री होणार आहे. अंजली वर्तक असे या पात्राचे नाव असणार आहे.या मालिकेतील अंजली वर्तक हे पात्र अभिनेत्री मुग्धा गोडबोले साकारणार आहे. मुग्धा गोडबोले या मराठीतील उत्तम अभिनेत्री आहेत. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे संवाद लेखन त्यांनी केले आहे.

त्यांच्या या लेखनाचे कौतुक होत आहे.दरम्यान ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील नव्या पात्राबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ‘ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. त्यामुळे या मालिकेचा भाग होताना मला अतिशय आनंद होतो आहे. माझ्या पात्राचे नाव अंजली वर्तक असे आहे. या पात्राच्या येण्याने मालिकेत खळबळ उडणार आहे.

अशा प्रकारच्या भूमिका माझ्या वाट्याला खूप कमी येतात. आतापर्यंत मी ज्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहे त्या सर्वच खूप सोज्वळ प्रकारच्या होत्या. त्यामुळे हे पात्र साकारणं नवं आव्हान असणार आहे. यात माझा लूकही फार वेगळा असणार आहे. मात्र ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत सर्वच कलाकार दिग्गज आहेत.

त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा येतं आहे. दरम्यान या मालिकेत अंजली वर्तक यांच्या एंट्रीमुळे नेमकं काय घडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


Post Views:
1

Source link

Leave a Comment