Skip to content
close

टिकटॉक फेम सूरज चव्हाण झळकणार लवकरच “या” मराठी चित्रपटातून, फेब्रुवारीत होणार हा चित्रपट प्रदर्शितताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉JoinViews:
76

“टिकटॉक” हजारो- लाखो लोकांचा विरंगुळा. मात्र ते बॅन झाल्यानंतर लोक जसे सैराभैरा झाले. आपली कला कुठे सादर करावी, असा प्रश्न मनात निर्माण होऊन त्यांना चिंता वाटू लागली. त्याचदरम्यान रिल्स ची सुरूवात झाली. मग काय सोशल मीडियाचा वापर करणारा प्रत्येकजण रिल्सवर आपली अंगकला दाखवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी येऊ लागला.

अगदी त्याचप्रमाणे एकाचवेळी कित्येक लोकांसोबत आपल्या बोबड्या भाषेत संवाद साधणारा आणि बहुतेक लोकांना “गोलीगत” आणि “बुक्कीत टेंगुळ” या ङायलॉग्जने खळखळून हसवणारा टिकटॉक फेम सूरज चव्हाण हा देखील इन्स्टाग्राम रिल्स मध्ये सहभागी झाला. त्याच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. सूरज हा आता सह्याद्री फिल्म प्रोडक्शन च्या प्रशांत शिगंटे निर्मीत “का रं देवा” ह्या आगामी मराठी चित्रपटातून लवकरच झळकणार आहे.

बारामती तालुक्यातील मोङवे गावचा हा सूरज चव्हाण. लहानपणीच आपल्या आईवडिलांचे छत्र हरपल्याने तो अख्ख्या महाराष्ट्राला आपले मायबाप मानतो. लहानपणापासून सूरज बोबङं बोलतो. त्याचे बोबडे बोलणे हे त्याचे शारीरिक व्यंग ठरले. त्यामुळे समाजाने त्याला आपल्यापासून दूर लोटले. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने लोकांना आपलेसे केले.

नवख्या कलाकारांच्या मागे उभे राहणारे या चित्रपटाचे निर्माते प्रशांत शिगंटे यांची सोशल मीडिया माध्यमातून सूरज सोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांनी सूरज ला आपल्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. प्रशांत सर मला भेटायला स्वतः माझ्या घरी आले, त्यांनी मला चित्रपटाची ऑफर दिली त्यामुळे मला खरंतर आश्चर्याचा धक्का बसला. लिहिता- वाचता न येणाऱ्या माझ्यासारख्या अशिक्षित मुलाच्या घरी सर स्वतः आले, ही कल्पना मी करूच शकत नव्हतो.

या चित्रपटात माझ्या शैलीला शोभेल अशी एका कॉलेजमधील मुलाची मी भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन रंजीत दशरथ जाधव यांनी केले आहे. तर अभिनेत्री मोनालिसा बागल, मयूर लाङ, जयवंत वाडकर, अरुण नलावडे आणि नागेश भोसले इ. कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसतील. तर येत्या फेब्रुवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सूरजचे सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळे सूरज पहिल्यांदा चित्रपटात कशाप्रकारे काम करतो, हे पाहण्याची त्यांना उत्सुकता लागली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हांला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.


Leave a Comment