Skip to content
close

‘झी मराठी’ वरील ही मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप


‘झी मराठी’ वरील ही मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

झी मराठी वाहिनीवरील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली मालिका म्हणजे ‘ती परत आलीये.’ या मालिकेने अगदी पहिल्या भागापासून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र कायमच चर्चेचा विषय ठरत असते.

गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत फार ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सध्या ही एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. मात्र या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. येत्या काही दिवसात ‘ती परत आलीये’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

झी मराठीवरील ‘ती परत आलीये’ या मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसत आहे. मात्र लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतंच या मालिकेचा शेवटचा भाग नुकतंच चित्रित करण्यात आला.

या मालिकेच्या कथानकानुसार ही मालिका फक्त १०० भागांची आहे, अशी घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. यानुसारच मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण पार पडले. त्यामुळे येत्या काही दिवसात या मालिकेचे शेवटचे भाग प्रदर्शित होणार आहेत. दरम्यान सध्या ही मालिका अंत्यत उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे.

गेल्या काही भागात या मालिकेत मस्कधारी व्यक्तीने हणम्याचा जीव घेतल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता त्याच मास्कधारी माणसाने रोहिणीच्या नवऱ्याला भडकवले आहे. त्यामुळे रोहिणीचा नवरा मास्कधारी व्यक्ती बननू तिचा आणि अभयचा जीव घेण्यासाठी त्या रिसोर्टजवळ पोहोचतो.

त्यानंतर पुढे त्या दोघांची झटापट सुरु असताना रोहिणीचा नवरा हा जखमी होतो. त्यात त्याचा वाचतो की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच हा मास्कधारी व्यक्ती नेमका कोण? याचा शोध घेण्यात हे सर्वजण यशस्वी होतात का? हे पाहणे देखील औत्सुक्याचे आहे.

येत्या आठ्वड्यापासून झी मराठीवरील नवीन मालिकेचा प्रोमोही प्रेक्षकांना पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे ‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेची वेळ बदलून १०.३० केली जाऊ शकते, असेही बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


Post Views:
1Source link

Leave a Comment