Skip to content
close

जगातील सर्वात नटखट मुलगा, ह्या मुलाच्या खोडकर अदा पाहून तुम्हीदेखील त्याच्या प्रेमात पडाल – Marathi Gappa

लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत आपण सगळेच जण अनुकरणीय असतो हे आपण जाणतोच. किंबहुना आपल्या व्यक्तिमत्व वृद्धी साठी अनुकरण करणं हे आवश्यक असतंच. पण आपलं हे अनुकरण जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं काही ठराविक साच्यांमध्ये बांधलं जातं. काही ठराविक ठोकताळे लावत आपण अनुकरणीय होतो. तसेच चांगल्या वाईटाची जाण आपल्याला असते असा आपला समज ही होतो. त्यामुळे आपली प्रगती ही ठराविक मार्गानेच होते असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. पण हे झालं मोठ्यांच्या बाबतीत.

लहान मुलं मात्र याबाबतीत मोठ्या मनाची असतात. किंबहुना त्यांना दिलेली मातीच्या गोळ्याची उपमा अगदी चपखल वाटावी अस त्यांचं वागणं असतं. त्यामुळे समोर जे घडतं आहे त्यातून ही छोटी मंडळी शिकत जातात. आपण त्यांना कसं वागावं, बोलावं हे शिकवत असतोच. पण आपलं खरं वागणं हे सगळ्यांत वरचढ ठरत त्यांच्या मनावर संस्कार करत असतं. त्यामुळे कधी कधी लहान असूनही एखाद्या मोठ्या व्यक्तीसारखा समजूतदार पणा असलेली लहान मुलं ही दिसतात.

त्यांचं हे सामंजस्य पाहून काही वेळा अचंबा वाटतो. पण हे सगळं त्यांच्या अनुकरणाने साध्य झालेलं असतं. अर्थात त्यांचा मूळ स्वभाव ही तेवढाच खतपाणी घालणारा असतो हे अमान्य करून चालत नाही. काही मुलं ही अगदी लहानपणापासून विनोदी असतात. त्यांचं वागणं, बोलणं यातून विनोद निर्माण होणं हे अगदीच नैसर्गिक वाटतं. त्यामुळे जी काही गंमत निर्माण होते त्यास तोड नाही. याचाच प्रत्यय आपल्या टीमला नुकताच आला. अर्थात हा काही खऱ्या आयुष्यात घेतलेला स्व अनुभव नव्हता. आपल्या टीमने एक व्हिडियो बघितला. त्यातील एका बाळाची मजा मस्ती पाहून आम्हाला हसणं आवरेना. इतकं की आम्ही हा व्हिडियो पुन्हा पुन्हा बघितला. आपणही हा व्हिडियो पाहिला असेल तर आपली पहिली प्रतिक्रिया ही पुन्हा पुन्हा व्हिडियो पाहणं हीच झाली असणार हे नक्की. कारण लहान मुलांचं अनुकरण किती तीक्ष्ण असू शकतं याचा हा व्हिडियो म्हणजे उत्तम उदाहरण आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला हा गोंडस बाळ आपल्या समोर बसलेला दिसून येतो.

त्याचं ते गोंडस रुप मनात घर करून जातं. पण हे केवळ काही सेकंद. कारण पुढचा सगळा वेळ या बाळाच्या बाललीला पाहण्यात जाणार असतो. सुरुवातीलाच तो हातात फोन घेतो. तसेच जणू काही कॉल वर बोलतो आहे अशा अविर्भावात त्याचं बोलणं ही सुरू होतं. पण त्यातलं त्याचं तोंडाचा चंबू करून बोलणं आणि हातवारे करणं यांमुळे धमाल येते. हे सगळे हातवारे आणि हावभाव घरातील मोठ्या मंडळींकडून त्याने शिकले असणार हे नक्की. पण हा छोटा इतका मस्त लबाड असतो की व्हिडियो जसजसा पुढे सरकतो तसतसा त्याचा वावर एखाद्या मोठ्या माणसासारखा होऊन जातो. त्यामुळे समोरच्या बैठकीवर हात ठेवून बोलताना तर त्याचा अविर्भाव बघावा असाच असतो. त्यात मधेच एका डोळ्याने समोर चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीकडे ही त्याचं लक्ष असतं. बरं व्हिडियो पुढे सरकता सरकता या छोट्याचा बोलण्याचा जोर इतका वाढतो की काही विचारू नका. मोठी माणसं कशी अगदी जोरकसपणे आपली मतं मांडत असतात त्याचं छोटं प्रारूप आपण पाहत असतो. त्याच्या बाळलीलांची मजा घेत असतो.

आपण हा व्हिडियो बघितला असेल तर आपणही यातली गंमत अनुभवली असेल. पण आपण हा व्हिडियो नसेल पाहिला, तर जरूर पहा. एका मिनिटापेक्षा कमी वेळ असलेला हा व्हिडियो आहे. पण त्यातून मिळणारा आनंद हा कैकपटीने मोठा आहे. खासकरून हल्लीच्या काळात सगळं साचेबद्ध स्वरूपात आपलं मनोरंजन होत असतं. पण हे असे निरागस व्हिडियोज नकळत आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटवून जातात. आमच्या टीमने तर हा व्हिडियो खूप वेळा पाहिला आहे आणि त्याचा आनंद घेतला आहे. आपणही हा आनंद चुकवू नका.

चला तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

Leave a Comment