Skip to content
close

घराबाहेर पडला पडल्या तृप्ती देसाईचे ‘शिवलीला’ बाबत धक्कादायक वक्तव्य !


बिग बॉस मराठी 3 मधून तृप्ती देसाई घराबाहेर पडल्या आहेत. घरात असताना तृप्ती ताई आणि कीर्तनकार शिवलीला या प्रचंड चर्चेत राहिल्या. या शोमध्ये सहभागी झाल्यापासून तृप्ती देसाई या चर्चेत होत्या. कारण समाजामध्ये जन आंदोलनासाठी त्या खूप प्रसिद्ध आहेत, तर महिलांसाठी त्या वेगवेगळे आंदोलन उभारत असतात.

त्यामुळे या शोमध्ये त्या काय कमाल दाखवतात याकडे अनेकांचे लक्ष होते. मात्र, सहभागी झाल्याचा काही आठवड्यातच तृप्ती देसाई यांना प्रेक्षकांनी बाहेर पाठवले. त्यांचे नॉमिनेशन झाले. हा सोडताना महेश मांजरेकर यांनी देखील तुप्ती देसाई चांगलं खेळण्याचे सांगितले.

एका वेब पोर्टल ला दिलेल्या मुलाखतीत तृप्ती देसाई यांनी शिवलीला वर थेट निशाणा साधला आहे. तृप्ती ताई म्हणाल्या, शिवलीला कीर्तनकार यांनी फेटे बांधले पाहिजेत. इंदुरीकर प्रकरणात मी सांगितल होता. बिग बॉस च्या घरामध्ये तिचा आणि माझा संपर्क आला. जेव्हा इंदुरीकर महिलांचा अपमान करत होते, तेव्हा तुम्ही भूमिका का नाही घेतली.

शिवलीला म्हणाली होती की, वारकरी संप्रदाय आमचा हो. पण वारकरी संप्रदायात तुम्ही पहिल्या ना. त्याचा प्रश्न आहे. आता तुम्ही फेटा घातलाय, तर तुम्ही आता त्यांना सपोर्ट करत नाही का? त्या वेळी तिला वाईट वाटलं होतं, असेदेखील कुट्टी देसाई म्हणाल्या. त्यावर शिवलीला म्हणाली होती की तुम्ही हा विषय‌ आता का काढताय.

महिला कीर्तनकार यांनी जर महिलांचा अपमान होत असेल तर त्या बाबतीत भूमिका घेणे गरजेचे आहे. नंतर तृप्ती देसाई म्हणाल्या, बिग बॉस च्या घरामध्ये ती नुसतीच वावरत होती. तिचे घरात कुठेही योगदान दिसल नाही, का स्वतःहून तिला निर्णय घेणे जमत नव्हत. तिला थोडा ताप आला होता‌. त्यावेळेस मी तिला पराठा बनवून दिला होता.

तृप्ती ताई पुढे म्हणाल्या, मी तिला म्हणाले, तू वयाने लहान आहेस. आमचा सल्ला ऐकत जा. मग तिला कुठेतरी असं वाटत होतं की, बोलायला गेल्यावर बाहेर काहीतरी वेगळा संदेश जाईल. तुम्ही जर असा संकुचित विचार करून आलेला असाल तर ते चुकीच आहे.

पहिल्या आठवड्यात तर ती कोणी अवतार असल्याचा सगळ्यांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. त्यानंतर शिवलीला बाळासाहेब पाटील ही काही दिवस आजारी पडल्यानंतर बिग बॉस ने तिला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर शिवलीला बाळासाहेब पाटील हीने हा शो सोडत असल्याची घोषणा केली.

त्यानंतर पंढरपूर येथे जाहीर कार्यक्रमामध्ये शिवलीला बाळासाहेब पाटील हिने कीर्तनकार आणि वारकरी समाजाची जाहीर माफी मागितली होती. आता तृप्ती देसाई पुन्हा शिवलीला विषयावर काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


Post Views:
1Source link

Leave a Comment