Skip to content
close

इन्कम टॅक्सने कसं शोधलं अत्तर व्यापाराच्या घरातील घबाड, संपूर्ण कहानी येणार “या” चित्रपटातून समोरताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉JoinViews:
19

उत्तर प्रदेशातील अत्तर व्यावसायिक पियुष जैन यांच्या निवासस्थानी छापा टाकून इनकम टॅक्स विभागाने कोट्यवधीच्या रोख रकमेसह सोनंनाणं आणि इतर उंची वस्तू जप्त केल्या आहेत. दरम्यान ह्या विभागाने केलेली ही कारवाई आता चंदेरी पडद्यावर दिसणार आहे. एकंदरीत याच कारवाईवर आधारित चित्रपट करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

प्रसिद्ध निर्माते कुमार मंगत पाठक यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपट निर्माते कुमार मंगत पाठक यांनी ह्या चित्रपटाची घोषणा केली असून, या चित्रपटाचे नाव रेङ – 2 असेल. याअगोदर त्यांनी रेङ या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यांनी सांगितले की,”रेङ या चित्रपटात आम्ही भिंतीमधून सुद्धा पैसे बाहेर पडू शकतात, असे दाखवले होते. परंतु हल्लीच कानपूर आणि कन्नोजमधील इनकम टॅक्स विभागाच्या छाप्यांमधून हा गैरप्रकार प्रत्यक्षात समोर आला. ते पाहूनच मी रेङ-2 ह्या चित्रपटाची निर्मिती केली होती.”

कुमार मंगत पाठक यांच्या 2018 मध्ये रिलीज झालेल्या रेङ या चित्रपटात अजय देवगण ह्याने एका इनकम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्याची भूमिका केली होती. तो आयकर विभागाचा अधिकारी म्हणून एका राजकीय नेत्याच्या घरावर धाङ टाकताना त्या चित्रपटात दिसला होता. परंतु रेङ-2 या चित्रपटात अभिनेता अजय देवगण असणार की नाही हे अद्यापही समजू शकलेले नाही.

आयकर विभागासह इतर विभागांनी देखील काही दिवसांपूर्वीच कानपूर मधील अत्तर व्यापारी पीयूष जैन यांच्या निवासस्थानावर छापा टाकला होता. त्या छाप्यात सुमारे 197 कोटींची रोख रक्कम, 25 किलो सोनं आणि 250 किलो चांदी जप्त करण्यात आली होती. तर सध्या पीयूष हा न्यायालयीन कोठडीत आहे. त्याचप्रमाणे ङीआरआने कस्टम अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला होता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.


Leave a Comment