Skip to content
close

आता शाळकरी मुलांना तैमूरचा देखील अभ्यास करावा लागणार? विद्यार्थ्यांना पेपरमध्ये विचारलं जाणार तैमूरचं नाव?ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉JoinViews:
14

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान हे एक नामांकित कपल आहे. परंतु आता त्यांचा मोठा मुलगा तैमूर अली खान हा देखील बराच प्रसिद्धीत असतो. तो हल्ली अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओज आणि फोटोज् देखील वायरल होत असतात. तसेच हा इवलासा तैमूर कॅमेरयासमोर सुद्धा अतिशय बिनधास्तपणे वावरताना दिसतो.

अहो, थोडक्यात म्हणजे करीना आणि सैफप्रमाणे आता त्याचे सुद्धा चांगलेच फॅनफॉलोइंग आहे. कारण लोकांमध्ये तो बराच फेमस आहे. त्यामुळेच तर आता तैमूरविषयी खोल अभ्यास करण्याची लोकांवर वेळ आली आहे. यामागील कारण म्हणजे तैमूरविषयी एका शाळेत मुलांना प्रश्न विचारण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातील खांङवा येथील शाळेत एक असा प्रश्न विचारण्यात आला की, त्यामुळे अगदी सर्वांचाच गोंधळ उडाला. कारण हा प्रश्न करीना व सैफ यांच्या तैमूर विषयी होता. असा प्रश्न विचारल्यावर शिक्षण अधिकाऱ्यांनी सुद्धा शाळेतील शिक्षकांना नोटीस बजावली आहे.


सामान्य ज्ञानातील चालू घडामोडींविषयी संबंधित विभागात करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या मुलाचे पूर्ण नाव काय? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रकारामुळे खांङवाचे जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणाले की, शाळेला नोटीस पाठविण्यात आली असून यावर कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल. त्याचप्रमाणे ते म्हणाले की, अशाप्रकारचे प्रश्न शाळकरी मुलांना विचारले जाऊ नयेत..असे मला वाटते.

त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला तर ठाऊकच आहे की, करीना व सैफ यांचा हा गोंडस मुलगा तैमूर याच्या नावावरून याआधी सुद्धा बरेचदा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे या दोन्ही स्टार्स पैकी करीना ला सर्वाधिक ट्रोल करण्यात आले. तसेच जहांगीर च्या नावामुळे देखील बराच धूमाकळ माजला होता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.


Leave a Comment