Skip to content
close

‘आई कुठे के करते’ मालिकेतील संजना उर्फ रुपाली भोसले अगोदर दिसत होती अशी की, ओळखणे ही होईल अवघड!! – Viral Batmya
टीव्ही किंवा चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांचे ग्लॅ’मरस फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. पण चित्रपट सृष्टीत येण्यापूर्वी ते कसे दिसायचे याबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. अनेक कलाकारांचे पूर्वीचे आणि आत्ताचे फोटो व्हायरल होताना दिसतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा फोटो पाहून मराठी सिनेसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखणंही कठिण असल्याचं अनेकांनी म्हटलं.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो आहे अभिनेत्री रुपाली भोसले हिचा आहे. मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅ’मरस अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश होतो. पण तिचा हा फोटो पाहून तिच्यात झालेला बदल पाहून अनेकांनी आश्चर्य वाटल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रुपाली भोसले अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत काम करतेय. मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही तिनं काम केलं आहे. सुमित राघवन यांच्यासोबत ‘बडी दूर से आये है’ ही तिची मालिका प्रचंड गाजली होती.

रुपाली ‘एका पेक्षा एक’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘कन्यादान’ अशा अनेक मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे. सध्या ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजनाची भूमिका साकारत आहे. आणि तिची ही व्यक्तिरेखा चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. बिग बॉसमध्ये आल्यानंतर रुपाली आणि पराग यांच्या नात्याची खूप चर्चा झाली. मात्र, रुपालीनं माझं आणि परागचं नात फक्त मैत्रीचं असल्याचं स्पष्ट केलं होतं.

रुपाली भोसले अंकित मगरेला डेट करत होती. अंकित रूपालीचा पीआर होता. बिग बॉस मराठी शोमध्ये सभागी होण्या आधीसुद्धा अंकित मगरेची पीआर कंपनी रूपालीचा पीआर मॅनेज करत होती. त्यानंतर रूपाली बिग बॉसमध्ये गेल्यावर सुद्धा या कंपनीने तिच्या पीआरची जबाबदारी पाहिली होती. दोघांचे प्रोफेशनल रिलेशनशिप कधी पर्सनल झाले त्यांच त्यांनाच कळालं नाही. रूपाली आणि अंकित यांनी आपल्या नात्याची जाहिररित्या कबुली दिली होती.

अनेकदा दोघेही एकमेकांसह फोटोशेअर करताना दिसायचे. यातून चाहत्यांनाही त्यांच्यामध्ये सुरु असलेल्या केमिस्ट्रीचा अंदाज आला होता. त्यामुळे फोटोवरुन दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याचे चाहत्यांना माहिती झाले होते. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री आहे. लॉकडाऊन काळात दोघांनीही गुपचूप लग्न उरकल्याचेही बोलले जाते.

लग्नाचे फोटो समोर आले नसले तरीही, सोशल मीडियावर रुपालीने अंकितसोबत शेअर केलेल्या फोटोंमुळे दोघांनीही लग्न उरकल्याचे तर्कवितर्क लावले गेले होते. रुपालीने गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत कुंकू भरल्याने तिने लग्न केल्याचे समोर आले होते. रुपालीचं अंकितसोबत हे दुसरे लग्न आहे.

2012 मध्ये रुपालीने लंडनमधील एका बिझनेसमनसोबत लग्न केले होते. मात्र काही काळानंतर दोघांच्या नात्यात कटुता निर्माण झाली आणि लग्नाच्या ७ वर्षानंतर घटस्फो’ट घेत ती भारतात परतली होती. बिग बॉस मराठी शोमध्ये सहभागी झाली होती तेव्हा अनेकवेळा तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना ती दिसली होती. सध्या रुपाली तिची आई आणि भावासोबत राहत आहे.

Leave a Comment